मुंबई : विविध आर्थिक गटांतील लोकांचे गुंतवणुकीचे नियमही तितकेच वेगवेगळे असतात. कारण, प्रत्येकाचे पैसे साठवण्याची पद्धतही तितकीच वेगळी असते. काही मंडळी पैसे गुंतवतानाही त्यामध्ये धोका पत्करण्यासाठी तयार असतात. पण, काहीजण मात्र इथंही 'सेफ गेम' खेळताना दिसतात.
सध्याच्या घडीला कमीत कमी काळात गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवण्यालाच प्राधान्य देण्यात येतं. परिणामी PPF आणि Mutual Fund हे पर्याय प्राधान्यस्थानी असतात. पण, या पर्यायांमध्येही काही तोटे आणि फायदे असतात. चला जाणून घेऊया हेच काही महत्त्वाचे मुद्दे. (PPF Vs Mutual Fund )
पीपीएफ- ही एक अशी योजना आहे जी भविष्यातील बचतीसाठी फायद्याची ठरते. सोबतच यामुळं करही वाचवता येतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना डिपॉझिट रकमेवर व्याज मिळतो. जो करमुक्त असतो.
फायदे थोडक्यात-
सरकारची विश्वासार्हता
सेक्शन 80 C अंतर्गत करमुक्त सवलत
500 रुपयांपासून बचतीची सुरुवात
व्यायावर निर्धारित मिळकत
म्युचुअल फंड- यामध्ये गुंतवणुकदार त्याचे पैसे गुंतवतो ज्याची गणितं काही निष्णात मंडळी करतात. अमुक एका योजनेतील सर्व गुंतवणुकदारांचे पैसे ही मंडळी त्यांच्या अनुषंगाने विविध ठिकाणी पुन्हा गुंतवतात.
फायदे थोडक्यात-
तुमचेय पैसे जाणकारांच्या हाती असतात.
एसआयपीसोबतच आणखीही बरेच पर्याय
अगदी तुटपुंज्या रकमेनं सुरुवात
समजा तुम्हाला प्रतिमहा 10 हजार रुपये गुंतवूनन कोट्यधीश व्हायचं आहे. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. पीपीएफचा परतावाही वाढत आणि कमी होत असतो. तरीही सरासरी व्याजदर मात्र 7.5 टक्के इतकाच असतो. ज्यामुळं अंदाज बांधला असता तुम्हाला कोट्यधीश व्हायला 27 वर्षे लागतील.
म्युच्युअल फंडबद्दल सांगावं तर, इथं तुम्हाला 10 ते 12 टक्के व्याजदर मिळतो. त्यामुळं तुम्ही दर महिन्याला जर 10 हजार रुपयांची गुंतवणूक करता आणि 12 टक्के परतावा मिळतो, तर 20 ते 21 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. पीपीएफपूर्वी तुम्ही या योजनेतून श्रीमंत व्हाल. बरं, इथं तुम्हाला गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेचीही आवश्यकता नाही.