लखनऊ : कॉंग्रेसची 'लडकी हू लढ सकती हू' अभियानातील पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून टिकिट न मिळाल्याने कॉंग्रेसवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कयास लावला जात होता की, त्या भाजपमध्ये सामिल होऊ शकतात. अखेर त्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. या यादीत कॉंग्रेसने एकूण 41 उमेदवारांचे नाव जाहीर केले आहेत. यामध्ये 16 महिला सामिल आहेत.
याआधी जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये 125 उमेदवारांचे नाव जाहीर झाले आहे. ज्यामध्ये 50 महिलांना टिकिट देण्यात आले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसला पक्षांतर्गत विरोधाला समोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या प्रचाराचा मुख्य केंद्र बिंदू असलेल्या 'लडकी हू लढ सकती हू' अभियानातील पोस्टर गर्ल प्रियंका मोर्यने कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मौर्य यांना टिकिट न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
टिकिट न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसवर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.