पोस्टाची धमाकेदार पॉलिसी, दरमहा 1300 रुपये गुंतवा आणि मिळवा 13 लाख सोबत खूप काही

पोस्ट ऑफीसच्या (Post Office Schemes) अनेक योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं.

Updated: Aug 27, 2021, 06:43 PM IST
पोस्टाची धमाकेदार पॉलिसी, दरमहा 1300 रुपये गुंतवा आणि मिळवा 13 लाख सोबत खूप काही title=

मुंबई : पोस्ट ऑफीसच्या (Post Office Schemes) अनेक योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं. अनेक जण पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफीसने सर्वसामांन्याना परवडेल अशी एक भन्नाट स्कीम आणली आहे. या स्कीमनुसार दरमहा 1 हजार 300 रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीनंतर 13 लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे या स्कीमवर फक्त मॅच्युरीटी अमाउंटच नाही तर इतरही फायदेही आहेत. या स्कीममध्ये कोण गुंतवणूक करु शकतो, याबाबत सर्व जाणून घेऊयात. (postal life insurance plan invest 1 thousand 3 hundred rupees in Endowment Assurance plan Santosh get 13 lakh rupees after maturity)

काय आहे स्कीम?  

संतोष पॉलिसी (Endowment Assurance (Santosh) असं या स्कीमचं नाव आहे. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या रक्कमेसह बोनसही मिळेल. या स्कीमसह आयआरडीएचा काहीही संबंध नाही. कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळवून देणारी ही स्कीम आहे. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर किंवा त्या दरम्यान पॉलिसीहोल्डरसह अप्रिय घटना घडल्यास त्याच्या नॉमिनिला त्याचा फायदा मिळेल.  

कोण गुंतवणूक करु शकतो?

या योजनेत सर्वांनाच गुंतवणूक करता येणार नाही. मात्र तरीही अनेकांना या गुंतवणूक करता येईल. शासकीय, निमशासकीय, सीए, मॅनेजमेंट कंसल्टेंट, वकील, बँकर, शासनमान्य असलेल्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत असणारे कर्मचारी, एनएसई आणि बीएसई लिस्टेड असणाऱ्या कंपनीचे कर्मचारी या पॉलिसीत पैसे गुंतवू शकतात.  

अटी आणि शर्थी.... 

या पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट घालण्यात आली आहे. किमान 19 तर कमाल वयाची अट ही 55 इतकी आहे. पॉलिसी घेताना गुंतवणूकदाराला कोणत्या वयात मॅच्युरिटी केव्हा हवी आहे, हे ठरवावं लागेल. गुंतवणूकदार  वयाच्या 35,40,45,50,55,58 आणि 60 वर्षांपर्यंत मॅच्युरिटी निवडू शकता.

या पॉलिसीत कमीत कमी सम एस्योर्ड हे 20 हजार तर जास्तीत जास्त 50,00,000 इतके आहे. एकूणच काय तर गुंतवणूकदार हा 20 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत विमा या पॉलिसीअंतर्गत घेऊ शकतो. गुंतवणूकदार या पॉलिसीचा हफ्ता दर आपल्या सोयीनुसार म्हणजेच 1, 3, 6 आणि 12 महिन्यांनी भरु शकतो.

हफ्ता किती भरावा लागेल? 

आता या स्कीमचा हफ्ता किती भरावा लागणार हे आपण उदाहरणाद्वारे जाणून घेऊयात. समजा गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी 30 वर्षांचा प्लॅन निवडला. तसेच 50 लाखांचा सम एस्योर्ड निवड केली. वयाच्या 60 व्या वर्षी पॉलिसी मॅच्युरिटी हवी असेल. तर गुंतवणूकदाराला 30 वर्ष योजनेचा हफ्ता भरावा लागेल. गुंतवणूकदार जर दर महिन्याने पॉलिसीचा भरणा करणार असेल, तर त्याला पहिल्या वर्षी दरमहा 1हजार 332 रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या वर्षात जीएसटी कमी झाल्याने 1 हजार 304 द्यावे लागतील. तसेच जर वर्षातून एकदाच हफ्ता द्यायचा असेल, तर एकूण 15 हजार 508 रुपये द्यावे लागतील.  

या 30 वर्षांच्या पॉलिसीच्या कालावधीत गुंतवणूकदार एकूण 4 लाख 55 हजार 51 रुपये हफ्ता भरेल. पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर गुंतवणूकदाराला 5 लाख रुपये आणि बोनसची एकूण 7 लाख 80 हजार इतकी रक्कम मिळेल. एकूणच गुंतवणूकदाराला 12 लाख 80 हजार रुपये मिळतील. तसेच बोनस म्हणून मिळणारी रक्कम ही या पॉलिसीत जोडली जाते. ती रक्कम अखेरीस मॅच्युरीटीच्या वेळेस दिली जाईल.