India Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज!

India Post Recruitment : देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे.

Updated: Jan 28, 2023, 04:23 PM IST
India Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज! title=
India Post Recruitment 2023

India Post GDS Bharti 2023 : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पदांच्या भरतीप्रक्रियेवर अनेकांची नजर असते. सरकारी नोकरीचं (Govt Jobs) फ्याड अनेकांना असल्याने अनेक तरूण तरुणी या पदांसाठी प्रयत्नशील असतात. अशात  आता भारतीय डाक विभागाने मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू केली आहे. पोस्ट खात्यात (India Post) एक दोन नव्हे तर तब्बल 40 हजार पदांची भरती (GDS Recruitment) निघाली आहे. त्यामुळे आता तरुण वर्गात आनंदाचं वातावरण दिसतंय. (Post department release 40 thosand gramin dak sevak bharti India Post Recruitment 2023 see notification)

देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे. याशिवाय ब्रांच पोस्टमास्टर (Branch Postmaster) आणि असिस्टंट पोस्टमास्टर (Assistant Postmaster) या पदांसाठी 10 हजार ते 24 हजार 470 रुपये इतका मासिक पगार दिला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषांसह दहावी पास असणं आवश्यक आहे. तुम्ही 10 वी पास असाल तर तातडीनं पोस्ट विभागातील पदांकरिता अर्ज करू शकता.

वयोमर्यादा काय? (Age limit criteria) 

अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार सर्व पदांसाठी उमेदवार किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाते. indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला पुर्ण माहिती मिळेल.

आणखी वाचा - महिलासांठी महत्त्वाची बातमी: हा कोणता Tax आहे जो महिला देतात पण त्यांना मात्र माहितीच नसते?

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेची अट केवळ दहावी पास ठेवण्यात आलीये. त्यामुळे या भरतीत अनेकांना अर्ज करता येणार आहे. केवळ दहावीत मिळालेल्या मार्कांच्या आधारावर उमेदवारांची निवड होणार आहे. उमेदवाराने दहावीच्या परीक्षेत इंग्रजी आणि गणिताचे पेपर पास केलेले असावेत. उमेदवारांना संगणक, सायकलिंग आणि उपजीविकेचे पुरेसे साधन यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पाहा पत्रक  - India Post GDS Notification (इथे क्लिक करा)

दरम्यान, महाराष्ट्रातून 2 हजार 508 जागांची भरती होणार आहे. उमेदवारांच्या वयाची अट 18 ते 40 इतकी ठेवण्यात आली असून अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना पाच तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.