कोरोनाच्या भीतीने रुग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी

या रुग्णाच्या कोरोना टेस्टचा अहवाल आला नव्हता.

Updated: Apr 5, 2020, 02:45 PM IST
कोरोनाच्या भीतीने रुग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी title=

नवी दिल्ली: दिल्लीत कोरोनाच्या (Coronavirus) एका संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) जयप्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रविवारी हा प्रकार घडला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. कोरोनाची लक्षणे जाणवून लागल्यामुळे त्याला 'एम्स'मध्ये भरती करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्ट झाली असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. 

Coronavirus: पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप

त्यामुळे हा रुग्ण मानसिकदृष्ट्या प्रचंड अस्वस्थ होता. याच नैराश्याच्या भरात त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सुदैवाने त्याचा जीव बचावला. मात्र, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. परंतु, सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. 

मोठी बातमी: साकीनाका झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण; मरकज कनेक्शन उघड

दरम्यान, दिल्लीत आता सामान्यांप्रमाणे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळीच दिल्लीत तीन डॉक्टरांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर दुपारच्या सुमारास दिल्ली कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील दोन परिचारिकांना (नर्स) कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

दरम्यान, देशभरात आतापर्यंत कोरोनाचे ३,३७४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३३ टक्के रुग्ण हे दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजशी संबंधित असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.