Prashant Kishor | प्रशांत किशोर लवकरच 'या' पक्षात प्रवेश करणार?

राजकीय  निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) लवकरच पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.  

Updated: Jul 14, 2021, 06:04 PM IST
Prashant Kishor | प्रशांत किशोर लवकरच 'या' पक्षात प्रवेश करणार?  title=

नवी दिल्ली :  राजकीय  निवडणूक रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर काँग्रेसचा 'हात' पकडणार असल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसच्या सू्ंत्रानुसार ही माहिती मिळाली आहे. या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीसोबत याबाबत चर्चा केली आहे".  प्रशांत किशोर यांनी मंगळवारी या तिघांची भेट घेत होतली होती. (political strategist and business tactician Prashant Kishor likely join indian national congress) 

प्रशांत किशोर यांची गांधी परिवाराबरोबर बैठक झाल्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की प्रशांत किशोर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी प्लॅन तयार करत आहेत. प्रशांत किशोर यांच्यासमवेत या नेत्यांची बैठक दिल्लीतील कॉंग्रेसच्या खासदाराच्या निवासस्थानी झाली. तिथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या बैठकीला उपस्थित होते. त्याचवेळी कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होत्या.

या बैठकीत पंजाब कॉंग्रेसचे दोन प्रमुख नेते सीएम अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांबद्दलही चर्चा झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक पुढील वर्षी पंजाब किंवा उत्तर प्रदेशात होणा  विधानसभा निवडणुकांबद्दल नव्हती आणि ती मोठ्या योजनेच्या तयारीचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये  प्रशांत कुमार काँग्रेससाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात.