पोलिस FIR नोंदवून घेण्यास नकार देतायेत? त्यानंतर पुढे काय करायचं, जाणून घ्या

भारतीय दंड संहितेनुसार, सामान्य नागरिकांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत.  

Updated: Jun 30, 2021, 07:54 PM IST
पोलिस FIR नोंदवून घेण्यास नकार देतायेत? त्यानंतर पुढे काय करायचं, जाणून घ्या title=

मुंबई : आपल्यावर झालेल्या अन्यायाची आपण पोलिसांमध्ये (Police) तक्रार दाखल करतो. पण अनेकदा पोलिसांबाबत काही जणांना वाईट अनुभव आलेला असतो. पोलिसांकडून अनेकदा एफआयआर (FIR) दाखल करुन घेण्यास नकार देण्यात येतो. भारतीय दंड संहितेनुसार, सामान्य नागरिकांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, या विशेषाधिकाराचा वापर सर्वसामान्य पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिल्यावर करु शकतात. पोलिसांनी एफआयआर घेण्यास नकार दर्शवल्यास पुढे नेमकं काय आणि कसं करायचं, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Police refuse to register FIR Then know out what to do next)  

कारवाईसाठी FIR बंधनकारक 

जेव्हा केव्हा गुन्हा घडतो, त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली जाते. त्यानुसार पोलिस अधिक चौकशी करुन प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला जातो. आरोप्यांवर एफआयआरशिवाय कारवाई करता येत नाही.  

पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिल्यावर काय?

पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिल्यावर, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊ शकता.  यानंतरही जर तक्रार घेतली जात नसेल तर, CRPC च्या सेक्शन 156 (3) नुसार 
महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करु शकता. तक्रारीनंतर महानगर दंडाधिकाऱ्यांना पोलिसांना एफआयआर दाखल करुन घेण्याबाबतचे आदेश देण्याचे अधिकार असतात. तसेच एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाऊ शकते.   

ऑनलाइन FIR

तसेच ऑनलाईन पद्धतीनेही एफआयआर दाखल करता येतो.  एफआयआर दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या वेबसाईटवर जावं लागेल. राजधानी दिल्लीत  E-FIR अॅपच्या मदतीने तक्रार दाखल करता येऊ शकते. 

संबंधित बातम्या : 

7th Pay Commission: सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचारी होणार मालामाल

Risk Free Investment | शेअर मार्केटचा नाद सोडा; या बेस्ट पाच स्किम्समध्ये पैसा लावा!