पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर

या महिन्यातला पंतप्रधानांचा पाचवा उत्तर प्रदेश दौरा आहे. 

Updated: Jul 28, 2018, 07:03 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या महिन्यातला पंतप्रधानांचा पाचवा उत्तर प्रदेश दौरा आहे. आज ते सर्वात आधी ट्रान्सफॉर्मिंग अर्बन लँडस्केप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शहराच्या विकासात ज्या तीन महत्त्वाच्या योजनांना तीन वर्ष पूर्ण होतायत. त्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोदन करण्यात आलंय. यामध्ये पंतप्रधान आवास योजना अटल मिशन फॉर रेज्युवेशन, अमृत योजन आणि स्मार्ट सिटी मिशनचा समावेश आहे. उद्या पंतप्रधान मोदी 60, हजार कोटींच्या 81 प्रकल्पांची सुरुवात करतील.