पंतप्रधान पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार, या दिवशी होणार बैठक

देशातल्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

Updated: Jun 12, 2020, 10:28 PM IST
पंतप्रधान पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार, या दिवशी होणार बैठक title=

नवी दिल्ली : देशातल्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ आणि १७ जूनरोजी सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करतील. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन टप्प्यांमध्ये बैठक होईल, असं सांगण्यात येत आहे. 

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे २,९७,५३५ रुग्ण सापडले. तसंच मृतांची संख्या ८,४९८ एवढी झाली आहे. आतापर्यंत कोरोनाचे १,४७,१९५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 

भारतात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. राज्यातली कोरोनाग्रस्तांची एकूण आकडेवारी १,०१,१४१ एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे ३,७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.