पंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे.  

Updated: Jun 13, 2020, 09:08 AM IST
पंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव आणि वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि पुढील नियोजन याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे. कोरोना  लॉकडाऊनमधून  (Lockdown) हळूहळू माघार घेण्याच्या दरम्यान चर्चा करणार आहे. याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मोदी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असताना ही बैठक होणार आहे. कोविड -१९ मधील अनलॉक -१ दरम्यान लॉकडाऊनने बाधित होणाऱ्या आर्थिक घडामोडींना गती देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती सर्वसामान्य लोकांना आणि व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चीन, कॅनडालाही महाराष्ट्राने मागे टाकले आहे.

 पंतप्रधान १६ आणि १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी दुपारी ३ वाजता संवाद साधणार आहेत. दोन दिवस डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या या बैठकीत राज्यांना दोन टप्प्यांत विभागले गेले आहे. त्यानुसार ही चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मुख्यमंत्र्यांशी दुपारी ३ वाजता चर्चा करणार आहेत.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असताना संवाद साधणार आहेत. कोविड -१९  'अनलॉक -१' दरम्यान लॉकडाऊनने बाधित झालेल्या आर्थिक कामांना गती देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती सर्वसामान्य लोकांना आणि व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.