इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रम्पनाही टाकलं मागे

 इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 1 कोटी 20 लाख फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या स्थानी आहेत. 

Updated: Dec 7, 2018, 04:42 PM IST
इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये पंतप्रधान मोदींनी ट्रम्पनाही टाकलं मागे title=

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशामध्ये लोकप्रिय नेता आहेत यामध्ये काही दुमत नाही पण जगामध्येही त्यांच्या चाहत्यांची कमी नसल्याचं दिसतंय. ते कोणत्याही देशात दौऱ्यावर जातात तेव्हा मोदी...मोदी नावाचे नारे दिले जातात. सोशल मीडियावरही त्यांचे लाखो चाहते आहेत. या बाबतीत तर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील खूप मागे सोडलंय. इंस्टाग्रामवर 1 कोटी 48 लाख फॉलोअर्स सहित पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म ट्विप्लोमॅसीने यासंदर्भात सूची जाहीर केलीय.

यानुसार इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 1 कोटी 20 लाख फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या स्थानी आहेत.

सर्वाधिक पसंती 

Image result for narendra modi, kohli and anushka zee

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो जगातील सर्वाधिक पसंदीचा बनलाय.

या फोटोला 18 लाख 34 हजार 707 लाईक्स मिळाले आहेत. बर्फाऴ दावोसमध्ये बस स्टॉपवर उभे असलेल्या पंतप्रधानांच्या फोटोला 16 लाख 35 हजार 978 लाईक्स मिळून तो जगातील सर्वाधिक पसंतीचा दुसरा फोटो ठरलाय. 

नमो अॅप

पंतप्रधान मोदी हे फेसबुक आणि ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर त्यांचे 4 कोटी 30 लाख तर फेसबुकवर 4 कोटींहून अधिक लाईक्स असून जगातील प्रसिद्ध नेत्यांच्या रांगेत आहेत.

आपल्या फॉलोअर्स पर्यंत नवनवीन माहिती पोहोचावी यासाठी त्यांनी 2015 ला नमो अॅप लॉंच केलंय.