'गुजरातची मदत केंद्र सरकारमुळे नाकारली'

उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर आपण गुजरातचे मुख्यमंत्री या नात्यानं इथल्या पुनर्निर्माणाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तत्कालिन केंद्र सरकारनं हे होऊ दिलं नसल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय. काँग्रेसनं हा आरोप फेटाळलाय.

Updated: Oct 20, 2017, 10:39 PM IST
'गुजरातची मदत केंद्र सरकारमुळे नाकारली' title=

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर आपण गुजरातचे मुख्यमंत्री या नात्यानं इथल्या पुनर्निर्माणाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तत्कालिन केंद्र सरकारनं हे होऊ दिलं नसल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय. काँग्रेसनं हा आरोप फेटाळलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगवान केदारनाथाचं दर्शन घेतलं. मोदींनी केदारनाथच्या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली. गेल्या सहा महिन्यातली नरेंद्र मोदींची ही केदारनाथला दुसरी भेट आहे.

२ मे रोजी केदारनाथाची कवाडं उघडली होती. तीही मोदींच्या हस्तेच उघडली गेली होती. आता आज मोदींनी दर्शन घेतल्यानंतर उद्या केदारनाथची दारं बंद होणार आहेत.

२०१३ साली केदारनाथच्या प्रलयानंतर तिथले रस्ते आणि इतर कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते झालाय.