दिवाळी मिलन कार्यक्रमात मोदींचा पत्रकारांशी संवाद

दिवाळी मिलन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. 

Updated: Oct 28, 2017, 07:59 PM IST
दिवाळी मिलन कार्यक्रमात मोदींचा पत्रकारांशी संवाद  title=

नवी दिल्ली : दिवाळी मिलन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही विकसीत होणं गरजेचं आहे आणि असे पक्ष देशाच्या लोकशाही व्यवस्था बळकट करण्यात महत्त्वाची भूमीका बजावतात असं ते म्हणाले.

लोकहाशीमध्ये प्रसारमाध्यमांचाही मोठा सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्वच्छ भारत अभियानात मीडियानं दिलेलं भरीव योगदान याचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदींसह सेल्फी काढण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.