नवी दिल्ली : आज नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
यंदा मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे शेवटच्या अर्थसंकल्प पूर्वीचा संवाद आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे.
अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.
बजेट सत्रात तीन तलाक विधेयकासह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. विरोधकांच्या गोंधळाची देखील या दरम्यान शक्यता आहे. लोकसभा, राज्यसभेच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या सत्राला सुरुवात होईल. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेत अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद हे मागासलेल्या वर्गाच्या विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी सरकारने जोर द्यावा असं अधोरेखीत करु शकतात.