अच्छे दिन : शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच 'हे' आश्वासन

 शेतकऱ्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Updated: Jun 30, 2018, 08:14 AM IST
अच्छे दिन : शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच 'हे' आश्वासन  title=

नवी दिल्ली : खरीपाला त्याच्या उत्पादन खर्चाच्या दिडपट किमान आधारभूत किंमत देण्याला आगामी कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊ असं आश्वासन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलं. पाच राज्यांतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रासह, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकचे सुमारे दीडशे ऊस उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. भाजप खासदार प्रीतम मुंडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन, मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या.