पंतप्रधान नरेंद्र मोदींनी '५' स्वप्ने...

 स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीने न्यू इंडियाचा संकल्प देशवासीयांसमोर ठेवला. सव्वाशे करोड देशवासियांना त्यांनी संबोधित केले की, पुरुषार्थ, त्याग आणि तपश्चर्येतून आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी गोरखपूरच्या घटनेवर प्रकाश टाकून त्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यानंतर काश्मीर समस्या ही मैत्रीपूर्ण भावनेतून सुटेल, असे त्यांनी सांगितले.  

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 15, 2017, 12:56 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी '५' स्वप्ने...  title=
देशातील गरीब आणि तरुणांसाठी मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरु केली आहे.

नवी दिल्ली: स्वातंत्रदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीने न्यू इंडियाचा संकल्प देशवासीयांसमोर ठेवला. सव्वाशे करोड देशवासियांना त्यांनी संबोधित केले की, पुरुषार्थ, त्याग आणि तपश्चर्येतून आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी गोरखपूरच्या घटनेवर प्रकाश टाकून त्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यानंतर काश्मीर समस्या ही मैत्रीपूर्ण भावनेतून सुटेल, असे त्यांनी सांगितले.  
त्याचबरोबर ते म्हणाले की, आपण सगळे मिळून असा भारत घडवू ज्यामध्ये गरिबाकडे पक्के घर, वीज आणि पाणी असेल. भ्रष्टाचाराबद्दल बोलताना पीएम म्हणाले की, एकाच पत्त्यावर ४०० कंपन्या चालत होत्या. भ्रष्टाचारबद्दल कोणत्याही तडजोड केली जाणार नाही. नोटबंदीनंतर काळा पैसा उघड झाला आहे. देशातील गरीब आणि तरुणांसाठी मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरु केली आहे. 
तीन वर्षानंतर साधारणपणे सव्वा लाख करोडपेक्षा अधिक काळा पैसा हाती लागला. तर पावणे दोन लाख करोड पेक्षा अधिक रक्कम संशयास्पद आहे. आपण देशाला विकासाच्या एका नव्या मार्गावर घेऊन जाऊया. त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वप्नातील भारताविषयी सांगितले आणि देशवासीयांची साथ असल्याशिवाय ही स्वप्न पूर्ण होणार नाहीत, असे देखील सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वप्नं... 

  • असा भारत साकारुया जो स्वच्छ, स्वस्थ असेल आणि स्वराज्याची स्वप्ने पूर्ण करेल. 
  • असा भारत साकारुया जो भ्रष्टाचार आणि जातीवादापासून मुक्त असेल. 
  • असा भारत साकारुया जिथे स्त्रियांना आणि तरुणांना त्यांची स्वप्नं साकारता येतील. 
  • असा भारत साकारुया जिथे शेतकरी चिंतामुक्त असेल, त्याला शांत झोप लागेल आणि तो जे कमवत आहे त्यापेक्षा अधिक कमवेल. 
  • असा भारत साकारुया जिथे गरिबाकडे पक्के घर, वीज आणि पाणी असेल.