नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोप्राचा लिंक्ड इनवरील प्रभावशाली प्रोफाईल्समध्ये समावेश !

लिंक्ड इनने २०१७ सालची प्रभावशाली अकाऊंट्सच्या नावांची घोषणा केली आहे. यंदा पॉवरफूल प्रोफाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड झाली आहे. 

Updated: Aug 24, 2017, 02:59 PM IST
नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोप्राचा लिंक्ड इनवरील प्रभावशाली प्रोफाईल्समध्ये समावेश ! title=

नवी दिल्ली : लिंक्ड इनने २०१७ सालची प्रभावशाली अकाऊंट्सच्या नावांची घोषणा केली आहे. यंदा पॉवरफूल प्रोफाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड झाली आहे. 

बुधवारी लिंक्ड इनकडून पॉवर प्रोफाईल्सच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भारतातील आघाडीच्या प्रोफाईल्सची नावं होती. प्रोफेशनल ग्रुपमध्ये स्वतःची विशेष ओळख स्थापन करणार्‍या ५० अकाऊंट्सची नावं यावेळी घोषित करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्लॅटफॉर्मवर २२ लाख फॉलोअर्स आहेत. पॉवरफूल प्रोफाईल्सच्या यादीमध्ये मोदींचे नाव तिसर्‍यांदा सामील करण्यात आले आहे. या प्रभावशाली यादीमध्ये चिल्ड्रन फाऊंडेशनचे संस्थापक कैलाश सत्यार्थी, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर, सीप्ला कंपनीचे ग्लोबल चीफ पीपल ऑफिसर प्रबीर झा आणि श्याओमी टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांच्या नावाचाही समावेश आहे.  

 "२०१७ च्या प्रभावशाली प्रोफाईल्सनी अनेक गोष्टींवर स्वतःची मतं आणि अनुभव व्यक्त केली. इतरांपर्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर आपली मतं मांडली. यामुळेच ते मजबूत ब्रॅन्ड बनले आहेत." असे मत लिंक्ड इन इंडियाचे कंट्री मॅनेजर अक्षय कोठारी यांनी मांडले आहे.