नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी गुरुवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पाया घातला. यानंतर, पंतप्रधान मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा प्रवीण पटेल यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केली आहे.
केशुभाई पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. त्याचा मुलगा प्रवीण पटेल यांचं अकाली निधन झालं. केशुभाई पटेल 1995 आणि त्यानंतर 1998 ते 2001 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गेल्या आठवडय़ात अमेरिकेच्या डॅलस येथे हृदयविकाराच्या झटक्यामुळे प्रवीन यांचा मृत्यू झाला होता. प्रवीण हा केशुभाई पटेल यांच्या सहा मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा होता.
केशुभाई 1980 ते 2012 या काळात भाजपचे सदस्य होते आणि या पक्षाकडून गुजरातचे मुख्यमंत्रीही होते. तथापि, 2012 मध्ये भाजपपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी गुजरात परिवर्तन पार्टी हा नवा पक्ष स्थापन केला.