नवी दिल्ली : जर माणसामध्ये हिम्मत असेल तर हजारो संकटांमध्येही तो मार्ग काढू शकतो. प्रवीण तेवतिया हा भारताचा वीर पूत्र देखील असाच आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांची गोळी छातीवर आणि कानाला लागल्यानंतर ही या जवानाने दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
३२ वर्षीय शौर्य चक्र विजेता आणि माजी मरीन कमांडो तेवतिया यांनी 72 किमी मॅरेथॉनमध्ये पदक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गोळी लागल्यानंतर प्रवीण अंशतः बहिरे झाले होते. यानंतर नौसेनेने त्यांना नॉन-ऍक्टिव्ह ड्यटी दिली होती. पण तेवतिया याने स्वत:ला फिट सिद्ध करण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
9 सप्टेंबरला, प्रवीणने लडाखमधील 71 कि.मी. खारदुंग येथील मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेतला होता. प्रवीणने निर्धारित वेळेत रेस पूर्ण करत पदक पटकावले. प्रवीणने सांगितले, "जेव्हा मला गोळी लागली तेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली, परंतु 5 महिने संघर्ष केला आणि मी निट झालो. पण माझी ऐकण्याची क्षमता निश्चितपणे कमी झाली आहे. नौदलात युद्धभूमीमध्ये 5 टक्के विकलांगांना देखील सेवा करण्याची संधी मिळते.
प्रवीणने 2014 मध्ये मॅरेथॉनचे प्रशिक्षण सुरु केले. मुंबई मॅरेथॉनमध्ये तो दुसऱ्या नावाने सहभागी झाला होता कारण तो अयशस्वी झाला तर नौसेना त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हे त्याला माहित नव्हतं. 2016 मध्ये त्यांनी भारतीय नौदलातील हाफ मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेतला होता.
प्रवीणने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, मार्चमध्ये या वर्षी त्याने जयपूरमध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. यामध्ये त्यांनी 19 किमी जलतरण, 90 किमी सायकल चालविणे आणि 21 किमी शर्यतीत भाग घेतला.
31 जुलै रोजी त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. शनिवारी त्यांनी पदक पक्क केलं आहे. प्रवीणने 18,380 फूट उंचीवर 12.5 तासांत मॅरेथॉन पूर्ण केले आणि पदक जिंकले. आता ते फुल इरॉन मॅन ट्राईथलॉनमध्ये भाग घेऊ इच्छित आहे.