भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे

Gaganyaan Mission Astronauts: भारतीची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणजे गगनयान मोहिम. चांद्रयान 3 आणि आदित्य एल-1नंतर भारत गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 27, 2024, 01:11 PM IST
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे title=
PM Modi reveals names of 4 Gaganyaan mission astronauts

Gaganyaan Mission Astronauts: चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान भारताचे पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीरांची निवड होणार यावरुन आता पडदा उठला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट निवडण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेसाठी चार आंतराळवीरांची नावे निश्चित करण्याची आल्याची माहिती समोर येतेय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील चारही आंतराळवीरांना एस्ट्रोनॉट्स विंग्स दिले आहेत. आता या चार जणांची नावे समोर आली आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. त्यांची नावे आहेत, ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. पंतप्रधान मोदींनी या चारही जणांना आझ पहिल्यांदाचा जगासमोर जाहीर केले आहे. या चारही जणांची रशियात ट्रेनिंग झाली असून सध्या बेंगळुरूमध्ये एस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

गगनयान मिशनसाठी हजारो वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यातील 12 जणांना निवडण्यात आले. त्यानंतर या सर्वांची निवड  इंस्टीट्यूट ऑफ एयरोस्पेस मेडिसन (IAM)मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर अनेक चाचण्या व परीक्षा घेतल्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा इस्रो आणि वायुसेनेने या चार वैमानिकांची नावांवर शिक्कामोर्तब झाले. वैमानिकांची निवड झाल्यानंतर इस्रोने 2020च्या सुरुवातीला त्यांना रशियाला प्रशिक्षणासाठी पाठवले होते. जेणेकरुन तिथे त्यांना मोहिमेसंदर्भातील सर्व प्रशिक्षण दिले जाईल. 

सध्या या चारही वैमानिकांची प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसंच, त्यांच्या फिटनेसवरही लक्ष देण्यात येत आहे. मात्र, हे चारही वैमानिक गगनयान मोहिमेत अंतराळात जाणार नाहीयेत तर. यातील दोन किंवा तीनच वैमानिक अवकाशात गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे.