'मित्रांना भेटणं नेहमीच...', Melodi सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

PM Modi responds On Melodi : दोघांच्या भेटीदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींबरोबर एक सेल्फी घेतला, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर #Melodi देखील ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय.

सौरभ तळेकर | Updated: Dec 2, 2023, 06:58 PM IST
'मित्रांना भेटणं नेहमीच...', Melodi सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात... title=
melodi, modi meloni

Giorgia Meloni’s Melodi post : यूएईची राजधानी दुबई येथे आयोजित हवामान बदलावरील COP-28 शिखर परिषदेसाठी (COP-28 summit 2023) आता जगभरातील दिग्गज नेते पोहोचले आहेत. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील हजेरी लावली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींबरोबर एक सेल्फी घेतला, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर #Melodi देखील ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय. जॉर्जिया मेलोनी यांच्या सेल्फीवर आता नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

शुक्रवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक सेल्फी पोस्ट केला होता. 'COP-28 मधील चांगली मैत्री... #Melodi', असं जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं होतं. अशातच आता त्यांच्या या एक्स पोस्टवर मोदींनी रिपोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांना भेटणं नेहमीच आनंददायी असतं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

पाहा पोस्ट

Melodi म्हणजे काय?

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. भारतात झालेल्या जी-20 मध्ये पंतप्रधान मेलोनी हजेरी लावली होती. त्यावेळी मोदी आणि मेलोनी यांचे हसताना आणि संवाद साधतानाचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचा नवा हॅशटॅग ट्रेंड झाला... Melodi... जॉर्जिया मेलोनी यांच्या नावातील Meloni आणि नरेंद्र मोदी यांच्या नावातील Modi याचं कॉम्बिनेशन म्हणजे Meloni... सध्या सोशल मीडियावर अनेक मिम्स या नावावरून पहायला मिळत आहे. 

COP-28 आहे तरी काय?

 सीओपी म्हणजे असे देश ज्यांनी 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारावर स्वाक्षरी केली होती. सीओपीची ही 28 वी बैठक आहे. म्हणून याला COP28 असं नाव देण्यात आलंय. COP28 पृथ्वीच्या तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट राखेल अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात सुमारे 200 देशांमध्ये यावर सहमती झाली होती. इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान निरीक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, 1.5 अंश सेल्सिअस हे एक महत्त्वाचं लक्ष्य आहे, ज्याद्वारे हवामान बदलाचे मोठ्या प्रमाणात जीवितहाणी थांबवली जाऊ शकते.