मन की बात: युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांअतर्गत देखील लढलं जातं : पंतप्रधान मोदी

कारगिल विजय दिनाच्या दिवशी सैनिकांच्या शौर्याचं स्मरण

Updated: Jul 26, 2020, 11:39 AM IST
मन की बात: युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांअतर्गत देखील लढलं जातं : पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनी देशातील सैनिकांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात असे म्हटले की, त्यावेळी पाकिस्तानशी मैत्री हवी होती, परंतु पाकिस्तानने युद्ध केलं. पण या युद्धात भारताच्या पराक्रमाचा विजय झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कारगिल युद्ध ज्या परिस्थितीत झाले, ती परिस्थिती भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तानने भारताची जमीन हस्तगत करण्यासाठी आणि अंतर्गत कलहांवरुन लक्ष हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विनाकारण प्रत्येकापासून शत्रुत्व घेणे दृष्टपणाचे रूप आहे. पाकिस्तानही असेच करत होता.

युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांअतर्गत देखील लढलं जातं. मागील काही दिवसांपासून देशाने एकत्र येत कोरोनाचा सामना केला आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. भारत आपल्या लाखो देशवासियांचा जीवन वाचवण्यात यशस्वी झाली आहे. कोरोना अजूनही तितकाच घातक आहे. चेहऱ्यावर मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग, हात धुवणे, महत्त्वाचं आहे. कोरोनाचा सामना करताना डॉक्टर्सचा विचार करा. मास्कचा त्रास झाला आणि तो काढून टाकायचा विचार येत असेल तर डॉक्टरांचं स्मरण करा. 

आव्हानं आली पण लोकांनी त्याचा सामना ही केला. सकारात्मकतेने संकटाला संधीमध्ये रुपांतर करता येतं. देशात याची वेगवेगळी उदाहरणं पाहायला मिळत आहेत. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कच्छ आणि लद्दाख काम करत आहे.  

दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे 14 वी मन की बात करत आहेत. तर २०१४ पासूनचा ही 67 वी 'मन की बात' आहे.