घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की.... 

सायली पाटील | Updated: Jan 5, 2024, 08:50 AM IST
घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय title=
PM Modi gets praised in Chinas Global Times know entire report details latest update

PM Modi gets praised in Chinas Global Times : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमावाद कोणापासून लपून राहिलेला नाही. किंबहुना या दोन्ही राष्ट्रांच्या नात्यामध्ये या वादामुळं निर्माण झालेला तणाव आणि इतर राजकीय हेवेदावे या तणावात कायमच भर टाकताना दिसले. पण, आता मात्र हेच शेजारी राष्ट्र भारतीय नेतृत्त्वाच्या प्रभावाखाली आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, थेट चीननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची दखल घेत देशाता आर्थिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 

चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधून पंतप्रधान मोदी यांच्यावर भाष्य करणारा एक प्रशंसनापर लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. शांघाई येथील Center for South Asian Studies at Fudan University च्या संचालकपदी असणाऱ्या Zhang Jiadong यांनी भारताची आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरण क्षेत्रांमधील प्रगती या लेखातून अधोरेखित करत मागील 4 वर्षांचा लेखाजोखा मांडला आहे. 

हेसुद्धा वाचा : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; हजारो कर्मचारी होणार लाभार्थी! 

झांग यांनी आपल्या या लेखामध्ये उदाहरणास काही गोष्टी सविस्तर रुपात मांडल्या. चीन आणि भारतादरम्यान असणाऱ्या व्यापार असंतुलनाविषयी चर्चा करत असताना पूर्वी भारतीय प्रतिनिधी मुख्यत्वे चीनी उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करत होते. पण, आता ते भारताच्या निर्यातक्षमतेवर जास्त भर देताना दिसत आहेत. सध्या एक राष्ट्र म्हणून भारत आर्थिक आणि सामाजिक विकासासोबतच राजकीयदृष्ट्यासुद्धा आश्वासक भूमिकेत. दिसत असून, 'Bharat narrative' साकार करत ते आणखी प्रगत स्वरुपात जगापुढं आणण्यासाठी सक्रीय झाला आहे, असं या लेखात लिहिण्यात आलं आहे. 

पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणांचं कौतुक 

ग्लोबल टाईम्समधील लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांचंही कौतुक करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर विविध राष्ट्रांशी असणारी नाती जपण्यापासून अमेरिका, जपान आणि रशिया या राष्ट्रांसोबतच्या नात्यांमध्ये आलेली दृढतासुद्धा या लेखात प्रकाशझोतात आणण्यात आली. त्याशिवाय रशिया- युक्रेन युद्धामध्ये भारतानं घेतलेली भूमिका देशाला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगासमोर आल्याचंही लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्रामधील हा लेख आणि त्यामध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत लिहिण्यात आलेले शब्द पाहता, चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!' असंच म्हणावं लागेल.