जामिनावर बाहेर असलेले गांधी मायलेक नोटबंदीवर टीका करतायेत - पंतप्रधान मोदी

मोदींची गांधी घराण्यावर जोरदार टीका

Updated: Nov 12, 2018, 02:59 PM IST
जामिनावर बाहेर असलेले गांधी मायलेक नोटबंदीवर टीका करतायेत - पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : छत्तीसगढमध्ये प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर कडाडून हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं राजकारण एका कुटुंबापासून सुरू होतं आणि त्या कुटुंबाभोवतीच संपतं अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गांधी घराण्यावर टीका केली आहे. 

काँग्रेसच्या काळात देशाचा विकास अतीसंथ गतीने झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे. गांधी मायलेक जामिनावर बाहेर असताना नोटबंदीवर टीका करत असल्याचा उल्लेख मोदींनी यावेळी केला. नोटबंदीमुळे यांना जामिनासाठी अर्ज करावा लागला. जे जामिनावर बाहेर आहेत ते मोदींना सर्टीफिकेट देणार काय असा सवाल मोदींनी यावेळी सभेत केला. 

भाजप विकासाच्या मुद्द्याशी कटीबद्ध असल्यामुळे विरोधकांना भाजपशी दोन हात कसे करावे असा प्रश्न पडत असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. बिलासपूर आणि जगदलपूर येथे पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या. छत्तीसगडमध्ये सोमवारी 18 जागांसाठी मतदान होत असून दुसऱ्य़ा टप्प्यातील मतदानाआधी प्रचारसभा अजून सुरु आहेत. 

नोटबंदीला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस भाजप सरकारवर टीका करत आहे. यानंतर आज पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान काँग्रेसच्या या टीकेला उत्तर दिलं.