लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध

त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. 

Updated: Mar 7, 2018, 12:27 PM IST
लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध  title=

नवी दिल्ली : त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. 

अशी कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्रिपुरात अभूतपूर्व विजयानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या मदतीनं हटवला होता. कार्यकर्त्यांच्या याकृत्याविरोधात देशभरात संतापाची लाट उठलीय. त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. 

काल संध्याकाळी तामीळनाडूतल्या पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. तिकडे पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या जाधोपुरू विद्यापिठातील शामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याचाही विटंबना करण्यात आली.