PM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं. हीराबेन यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबाद येथी मेहता हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) ट्वीट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबेन यांचा एक फोटोही शेअर केला. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी मुखाग्नी दिला.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर अहमदाबादच्या (ahamadabad) के. यू. एन. मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर पंतप्रधानांनी अहमदाबादला जाऊन हिराबांची भेट घेतली होती. अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त झाला आणि शुक्रवारी पहाटे तीन वाजता हिराबेन यांचं निधन झालं. हिराबेन मोदी यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आले आहे.
वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. गृहमंत्री म्हणाले की, आई ही माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि शिक्षिका असते आणि आई गमावण्याचे दुःख हे निःसंशयपणे जगातील सर्वात मोठे दुःख आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये शिंदे म्हणतात, "पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली."
शरद पवारराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणार्या व्यक्तीचे हे नुकसान आहे! कृपया तिच्या नुकसानाबद्दल माझे प्रामाणिक शोक स्वीकारा. तिच्या आत्म्याला चिरशांती लाभो, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या आईचे दुःखद निधन, आम्ही सर्व त्यांच्या दुःखात सहभागी. आपल्यावतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.