मुंबई : PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचे उत्पन्न वाढवण्यापासून ते आर्थिक मदत करण्यापर्यंत सरकार प्रयत्नशील आहे. नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून 15 लाख रुपये मिळणार आहेत. या सरकारी योजनेचा कसा लाभ घेता येईल त्याविषयी जाणून घेऊ या...
सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.
यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होईल.