PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेत मिळणार 3 पट अधिक रक्कम? जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सध्या 1 लाख 20 हजार रुपये मिळत आहेत.

Updated: May 26, 2022, 07:48 AM IST
PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेत मिळणार 3 पट अधिक रक्कम? जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन title=

मुंबई : केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर मिळणाऱी रक्कम वाढवण्याच्या विचारात आहे. आता या विशेष योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. आता घरे बांधण्याचा खर्च वाढल्याचे समितीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता रक्कमही वाढवायला हवी. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील. 

पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार!

यापूर्वी झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याची शिफारस केली होती. समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. 

झामुमोचे आमदार दीपक बिरुआ म्हणतात की, प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किमती वाढल्या आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती

बीपीएल कुटुंबे 50 हजार ते एक लाख रुपये देऊ शकत नाहीत, असे बिरुआ यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता येतील.