मुंबई : कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला होता. या थेरपीमुळे त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारना झाल्याचं लक्षात आलं आहे. एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्लाझ्मा थेरपी केलेल्या रुग्णाला आता आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण देशातला पहिला व्यक्ती आहे ज्याच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
दरम्यान डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सरकारकडून अद्याप प्लाझ्मा थेरपीसाठी कोणत्याही प्रकारची मंजूरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या थेरपीला लवकरात लवकर मान्यता मिळावी म्हणून मागणी केली जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे.
प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या रुग्णाचं वय ४९ वर्ष आहे. त्याच्या कुटुंबातील ४ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याची आई आणि बहीण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्या आहेत. दरम्यान ४८ वर्षीय रुग्णाची प्रकृती ८ एप्रिल रोजी अचानक बिघडली त्यानंतर त्याला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली.