चिमुरड्याची हत्या करून मांस खाल्लं, न्यायालयाने दिली ही शिक्षा

येथील पीलिभीतच्या अमरिया पोलीस स्थानकात एक धक्कादायक प्रकरण आलं होतं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी 6 वर्षीय निरागस मुलाची हत्या करून त्याच मांस खाणाऱ्या व्यक्तीला अपल जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारावर मिळालेल्या शिक्षेवर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 11, 2018, 09:39 AM IST
चिमुरड्याची हत्या करून मांस खाल्लं, न्यायालयाने दिली ही शिक्षा  title=

उत्तर प्रदेश : येथील पीलिभीतच्या अमरिया पोलीस स्थानकात एक धक्कादायक प्रकरण आलं होतं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी 6 वर्षीय निरागस मुलाची हत्या करून त्याच मांस खाणाऱ्या व्यक्तीला अपल जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारावर मिळालेल्या शिक्षेवर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 

काय आहे हा प्रकार? 

अमरिया पोलीस ठाण्याअंतर्गत गतवर्षी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी नजीम मियाँ नावाच्या एका व्यक्तीने शेजारी राहणा-या सहा वर्षीय मोहसीनचं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करत हत्या केली. आरोपी नजीम मियाँने क्रूरतेची परिसीमा गाठत त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि खाल्ले. इतकंच नाही तर त्याने त्याचं रक्तही प्यायलं. पोलिसांनी त्याला मांस खाताना आणि रक्त पिताना रंगेहात पकडलं होतं. आरोपी नजीम अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. पोलिसांना त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी बराच वेळ लागला.

न्यायालयाने सुनावली शिक्षा 

मंगळवारी आरोपी नजीमला फाशीचा शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश संजीव शुक्ला यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नजीमला दोषी ठरवत कलम ३०२ अंतर्गत मृत्यूदंड आणि ३७७ अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा तसंच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेसोबत २५ हजारांचा दंड ठोठावला.