उत्तर प्रदेश : आता पिलभीतमध्येही 100 प्राथमिक शाळा रंगल्या भगव्या रंगात

मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालयही नुकतेच भगवे करण्यात आले होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 9, 2017, 04:37 PM IST
उत्तर प्रदेश : आता पिलभीतमध्येही 100 प्राथमिक शाळा रंगल्या भगव्या रंगात title=

पिलभीत : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी इमारतींचे भगविकरण जोरात सुरू आहे. एनएक्स आणि सरकारी बंगल्यांचे भगविकरण केल्यावर आता शाळासुद्धा भगव्या रंगात रंगवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिलभीतमधील 100हून अधिक शाळांच्या इमारती ज्या प्राथमिक विद्यालयांच्या आहेत या भगव्या करण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, शिक्षकांनी म्हटले आहे की, विरोध केला असतानासुद्धा गावच्या सरपंचांनी शाळांना भगव्या रंगाने रंगवले आहे. असेही बोलले जात आहे की, शाळा रंगवण्यासंबंधीचे आदेश हे शिक्षण विभागाकडून आले नव्हते. तर, काही अधिकाऱ्यांनीच दिले होते. दरम्यान, सर्व शिक्षा अभियानात म्हटले आहे की, सर्व प्रकारच्या प्राथमिक विद्यालयांचा रंग हा पाढरा असावा. प्रसारमाध्यमांध्ये आलेले वृत्तांमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे की, वाद निर्माण झाल्यामुळे शाळांचा रंग पुन्हा बदलण्यात येऊन तो पांढरा केला जाऊ शकतो.

दरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालयही नुकतेच भगवे करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कार्यलाय लाल बहादूर शास्त्री भवन येथे आहे. या परिसराला एनेक्सी म्हणून ओळखले जाते. आजवरच्या इतिहासात गेली अनेक वर्षे पांढऱ्या रंगात मोठ्या डौलात उभी असलेली ही इमारत योगींच्या कार्यकाळात रंग बदलत्या आवस्थेत दिसत आहे. भवनाबाहेरील भिंती भगव्या रंगांनी रंगल्या आहेत. इमारतीचे छत आणि आतील भागही अशाच पद्धतीने रंग बदलत्या आवस्थेत दिसत आहे.

योही आदित्यनाथ हे एनेक्सी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बसतात. योगींचे कार्यलयही भगव्या रंगात झळकत असून, केवळ केबिनच नव्हे तर, टेबल, खूर्ची, कारपेट आणि कपाटेही भगवी झाली आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, रंग बदलण्याच्या निर्णयाबाबत बोलताना योगेश शुक्ला या अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, आमच्या समोर अनेक रंगाचे पर्याय होते. मात्र, त्यातून आम्ही केशरी रंगच निवडला. योगी सरकारच्या या रंगतदार निर्णयावर कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ यांनी खोचक टिप्पणी केली आहे. अमरनाथ यांनी म्हटले आहे की, कोणताही रंग वाईट नसतो. मात्र, सरकारी खुर्च्या केशरी रंगाने रंगवने हे नोकरशाहीचे भगविकरण करण्यातला प्रकार आहे. दरम्यान, या रंगरंगोटीमुळे देशाच्या राजकारणात भलताच रंग भरला जाणार अशी चिन्हे आहेत.