देशात लोकसंख्या कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका

देशाची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असताना आता हा मुद्दा चक्क कोर्टाच्या पायरीवर पोहोचलाय. 

Updated: Feb 16, 2018, 03:48 PM IST
देशात लोकसंख्या कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका title=

नवी दिल्ली : देशाची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असताना आता हा मुद्दा चक्क कोर्टाच्या पायरीवर पोहोचलाय. 

काय केली याचिका?

लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. दोन मुलांपेक्षा जास्त मुले असू नयेत, तीन मुलं असणा-यांचे सर्व सरकारी लाभ काढून घ्यावेत, तीन अपत्य असलेल्या पित्याचा मतदारानाचा अधिकार रद्द करावा, लोकसंख्या कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले यासंदर्भात सरकारकडून कागदपत्रं मागवावीत अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्यात. 

कुणी केली याचिका?

ॲड अनुज सक्सेना, ॲड प्रिया शर्मा, ॲड पृथ्वीराज चौहान यांनी ही याचिका केलीये. यावर पुढल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.