अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

 फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी सोनं खरेदीची एक ऑफर घेऊन आलंय.

Updated: Nov 24, 2020, 08:53 AM IST
अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर  title=

मुंबई : कोरोनाचं (COVID19) संकट ओढावल्यानं सोन्याच्या भाव (Gold Rate) सध्या गगनाला भिडलेयत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोनं खरेदीसाठी लोकं गर्दी करतायत. अशावेळी सोन्याच्या किंमती कमी असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसलं तरी  फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलंय. 

सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झालीय. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने यासंदरभात माहिती दिली. ३५ टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय. 

डिसेंबर २९१७ मध्ये फोन पे सोनं कॅटेगरी सुरु केली आणि गेल्या ३ वर्षांपासून सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागीदारी केली. यामुळे देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन सोनं खरेदी करता येते. फोन पे वर खरेदी केलेलं सोनं हे २४ कॅरेटचं असली सोनं असतं. जे ग्राहकांच्या बजेटनुसार कधीही खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत १ रुपयांपासून सुरु होते.

सोनं डिलीव्हरीचा पर्याय 

ग्राहकांना सोनं डिलीव्हरीचा पर्याय देखील मिळू शकतो. नाणी किंवा बिस्किटच्या रुपात याची घरपर्यंत डिलीव्हरी मिळू शकते. अर्धा ग्रामपेक्षा कमी वजनापासून याची पूर्तता होऊ शकते. पूर्ण भारतातून १८ हजार ५०० हून अधिक पिनकोडपासून ग्राहक फोनपेने सोनं खरेदी करु शकतात. ज्यामध्ये छोट्या गावं आणि शहरांमधील ६० टक्के ग्राहक आहेत. 

फोनपेकडे सोनं खरेदीसाठी चांगल्या डिजाईन आणि प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांना दरमहा सोनं खरेदीसाठी मदत व्हावी यासाठी आम्ही रिमाईंडर सेवा सुरु करतोय असेफोनपे म्यूचुअल फंड्स एंड गोल्ड (Phone Pe Mutual Funds & Gold) चे प्रमुख टेरेंस लुसिएन यांनी सांगितले. नियमित गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी माइलस्टोन सुविधा असल्याचे ते म्हणाले.