मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO Latest News) म्हणजेच EPFO च्या 6.5 कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO सणांपूर्वी ग्राहकांच्या खात्यात 8.5% व्याज टाकण्याची तयारी करत आहे. ईपीएफओने स्वतः ही माहिती एका ट्विटद्वारे आपल्या ग्राहकांना दिली आहे. ट्विटरवर वापरकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ईपीएफओने सांगितले की, त्यांची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच ग्राहकांच्या खात्यात त्यांना पैसे मिळतील.
ईपीएफओने म्हटले आहे की, जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, ती एकाच वेळी खात्यात जमा केले जातील. कोणाचेही नुकसान होणार नाही म्हणून कृपया धीर धरा.
ईपीएफओने व्याजाबद्दल ट्विट केले असले, तरी त्यांनी हे सांगितले नाही की, भविष्य निर्वाह निधी व्याजाचे पैसे खात्यात कधी हस्तांतरित केले जातील? त्यामुळे ग्राहकांना मोदी सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5% व्याज मंजूर केले आहे. असे मानले जाते की, ऑगस्टच्या अखेरीस पीएफचे 8.5% व्याज हस्तांतरित केले जाऊ शकतात.
2019-20 या आर्थिक वर्षात, केवायसीमधील अडथळ्यामुळे, अनेक ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5%व्याजदर ठेवले होते, जे गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.
तुम्हाला जर तुमचे खात्यातील शिल्लक माहित करुन घ्यायचे असेल तर काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगमार आहोत.
तुमचे पीएफचे पैसे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला ईपीएफओच्या संदेशाद्वारे पीएफचा तपशील मिळेल. इथे तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.
i. ऑनलाइन शिल्लक तपासणी करण्यासाठी, EPFO वेबसाइटवर लॉग ऑन करा, epfindia.gov.in वर ई-पासबुकवर क्लिक करा.
ii. तुमच्या ई-पासबुकवर क्लिक केल्यावर एक नवीन पान passbook.epfindia.gov.in . येईल.
iii. आता इथे तुम्ही तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड टाका
iv. सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्ही एका नवीन पानावर येता आणि येथे तुम्हाला सदस्य आयडी निवडावा लागेल.
v. येथे तुम्हाला ई-पासबुकवर तुमचे ईपीएफ शिल्लक मिळेल.
i. तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओ वर क्लिक करा.
ii. आता दुसऱ्या पानावर, (employee-centric services) कर्मचारी-केंद्रित सेवांवर क्लिक करा.
iii. येथे तुम्ही 'View Passbook' वर क्लिक करा. यासह, आपण आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड (ओटीपी) क्रमांक भरा.
iv. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचे पीएफ शिल्लक तपासू शकता.
जर तुमचा UAN नंबर EPFO मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या PF शिल्लक बद्दल माहिती संदेशाद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO लिहून 7738299899 वर पाठवावे लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. जर तुम्हाला हिंदी भाषेत ही माहिती हवी असेल, तर तुम्हाला EPFOHO UAN लिहून पाठवावा लागेल.
पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्यालम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. पीएफ बॅलन्ससाठी, तुमचे यूएएन, बँक खाते, पॅन आणि आधार (आधार) जोडणे आवश्यक आहे.