Pf Intrest Rate : पीएफधारकांसाठी (Pf Holder) महत्त्वाची आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे. पीएफओने 7 कोटी सदस्यांना मोठी माहिती दिली आहे. पीएफधारकांच्या खात्यात अजूनही व्याजाची (Pf Intrest Rate) रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे पीएफधारक अजून खात्यात रक्कम का आली नाही म्हणून चिंतेत आहेत. यादरम्यान एका सदस्याने ईपीएफओला (Epfo Tweet) ट्विटद्वारे याबाबत विचारलं. यानंतर ईपीएफओने उत्तर दिलंय. (pf intrest news epfo inform about pf intrest money marathi news)
एका पीएफधारकाने पीएफ व्याजाबाबत अर्थ मंत्रालय, ईपीएफओ आणि पीएमओ इंडियाला टॅग करत ट्विटद्वारे प्रश्न विचारला. यानंतर पीएफओने या ट्विटला उत्तर दिलं. यावर "खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच तुमच्याही खात्यात रक्कम जमा होईल", असं उत्तर इपीएफओकडून देण्यात आलंय. दरम्यान ईपीएफओच्या उत्तरामुळे असंख्य पीएफधारकांना मोठा दिलासा मिळालाय.
प्रिय सदस्य, ब्याज जमा करने की प्रक्रिया जारी है और यह जल्द ही आपके खाते में दिखाई देगी। जब भी ब्याज जमा किया जाएगा, इसका पूरा भुगतान किया जाएगा। ब्याज की हानि नहीं होगी।
— EPFO (@socialepfo) December 6, 2022
ईपीएफओच्या या उत्तरामुळे आता वर्षाअखेरीस खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल, अशी आशा पीएफधारक व्यक्त करत आहेत. पीएफवरील व्याज मोठ्या प्रक्रियेनंतर खात्यात जमा होतो. याच कारणामुळे पीएफधारकांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास वेळ जातो. ईपीएफओ व्याजदर ठरवतं. त्यानंतर याबाबतची आवश्यक माहिती ही अर्थ मंत्रालयाला पाठवली जाते. अर्थ मंत्रालयची परवानगी मिळाल्यानंतर आर्थिक जमवाजमव केली जाते.