मुंबई : पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे.
पेट्रोल - डीझेल जर जीएसटीच्या अंतर्गत आल्यास त्यावर टॅक्स 28 टक्के असणार आहे. जरी पेट्रोल - डीझेलवर अधिक टॅक्स लावले तरी तुम्हाला 33.37 वर 9.34 रुपये जीएसटी देणं गरजेचं आहे. जीएसटी आणि पेट्रोलची किंमत मिळून जवळपास 43 रुपये होईल.
त्यांनी सांगितलं की, राज्यातील विकास योजना चालवण्यासाठी रेवेन्यू हा सर्वात मोठा हिस्सा आहे. म्हणून आतापर्यंत राज्यांमध्ये पेट्रोल - डीझेल यांच्यावर जीएसटीकरता सहमती मिळालेली नाही.