मुंबई : सरकारच्या तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर केला आहे. गेल्या 11 दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील दिलासादायक आहे. (Petrol Diesel Prices remains unchanged for straight 11 days, Todays Rate )
17 जुलैला इंधनाच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आजपर्यंत वाढ झालेली नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रती लीटर आहे तर डिझेल 89.87 रुपये प्रती लीटर आहे. तसेच मुंबईत आज पेट्रोला दर 107.83 रुपये तर डिझेलचा दर 97.45 रुपये प्रती लीटर आहे.
जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 9 वेळा आणि डिझेलच्या किंमतीत 5 वेळा वाढ झाली आहे. एक दिवस डिझेलच्या किंमतींमध्ये घसरण देखील झाली. यापूर्वी मे आणि जून महिन्यांत ईंधनच्या किंमतींमध्ये 16-16 दिवसाची वाढ झाली आहे. 4 मे नंतर आतापर्यंत राजधानी दिल्ली येथे पेट्रोलचा दर 11.44 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 09.14 रुपये प्रति लीटर महागलं आहे.
शहर |
पेट्रोल |
डिझेल |
मुंबई |
107.83 |
97.45 |
पुणे |
107.56 |
95.71 |
नाशिक |
107.70 |
95.85 |
औरंगाबाद |
109.12 |
98.69 |
कोल्हापूर |
107.80 |
95.97 |
(Petrol and diesel Price) चालू महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. याच गमिताची फोड करुन पाहिल्यास समोर आलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 55 आणि 50 टक्के राज्यांचे कर जोडलेले असतात. पुरी यांनी लोकसभेच्या एका सत्रामध्ये दिलेल्या लिखित स्वरुपातील उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, केंद्राकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोलच्या दरांवर 1,01,598 कोटी रुपये आणि डिझेलच्या दरांवर 2,33,296 इतकी कराची रक्कम आकारली आहे.