Petrol Diesel Price : या शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price on 26 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली असतानाही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दरावर काय परिणाम झाला आहे जाणून घ्या... 

Updated: Mar 26, 2023, 10:53 AM IST
Petrol Diesel Price : या शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर title=
Petrol diesel prices on March 26, 2023

Today Petrol Diesel Rate : देशातील तेल विपणन कंपन्यांनी आज (26 मार्च 2023) पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना देशभरातील पेट्रोलचे (Petrol Price) दर स्थिर आहेत. दरम्यान गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी कच्चे तेल प्रति बॅरल 139 डॉलरवर होते. मात्र तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. परिणाम आजही ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 75 च्या खाली आहे. 

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Price)  दर जारी केले आहेत. आज जारी केलेल्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. मात्र राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही वाहनांच्या इंधनाच्या किमती स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा: ISRO ने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट लॉंच, पाहा VIDEO 

या शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल 

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्तात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price)  विकले जाते. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे. IOCL च्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

शहर पेट्रोल रुपये/लीटर डीझेल रुपये/लीटर
दिल्ली  96.72  89.62 
मुंबई  106.31  94.27 
कोलकाता  106.03  92.76 
चेन्नई    102.63  94.24
गुरुग्राम   97.18  90.05
जयपुर 108.48  93.72 
भोपाळ 108.65  93.90 
पटना 107.24 94.02
लखनऊ 96.57  89.76 
रांची   99.84 94.65

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.