Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

Petrol and Diesel Price Today: मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेल प्राईसनं (Fuel Price) किमतीतला उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण आहे. आता कालच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज मोठी वाढ (How to Check Petrol and Diesel Price) झाल्याचे दिसते आहे. चला पाहूया काय आहेत आजचे दर! 

Updated: Mar 11, 2023, 08:11 AM IST
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!  title=
petrol diesel price today what are the latest prices of petrol diesel fuel in your city click to know more

Petrol and Diesel Price Today: सध्याच्या महागाईच्या जगात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price in India) किमती या गगनाला भिडल्या आहेत. त्यातून नव्या आर्थिक वर्षातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आलेख हा वाढताच राहिला आहे. खाजगी वाहनधारकांसाठी सध्या ही दरवाढ डोकेदुखी ठरली आहे. काल 10 मार्च रोजी पेट्रोलच्या किमती या 106.31 रूपये प्रति लिटर एवढी किंमत (Petrol and Diesel Price in Mumbai) होती तर डिझेलची 94.27 प्रति लीटर एवढी किंमत होती. गेल्या मार्च महिन्यात पेट्रोलची किंमत ही शंभर रूपयांच्या पार गेलेली पाहायला मिळाली आहे. त्यातून एका दिवसातच म्हणजे कालच्या दरापेक्षा आजच्या दरात तब्बल 5 रूपयांनी वाढ होतं पेट्रोलची किंमत ही 111.30 प्रति लिटर इतक्यानं वाढली आहे. त्यामुळे आता खाजगी वाहनधारकांना (Price Hike in Petrol and Diesel) आपल्या खिशातले एक्स्ट्रा पैसे यासाठी मोजावे लागणार आहेत. (petrol diesel price today what are the latest prices of petrol diesel fuel in your city click to know more)

वाढत्या प्रदुषणाचीही (Cilmate Change) समस्या आपल्याला सतावेत आहे. त्यातून अशावेळी अनेक लोकं लांबचा प्रवास सोडला तर जवळच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करताना दिसतील त्यामुळे सध्या एकीकडे वातावरण बदल आणि दुसरीकडे महागाई (Inflation) त्यामुळे सामान्य ग्राहक हा अत्यंत चितेंत आहे. मुंबई, महाराष्ट्रात 1 मार्च पासून ते 10 मार्चपर्यंत पेट्रोलच्या दरात फारशी वाढ न झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तोच डिझेलच्या किंमतीमध्येही सगळेच स्थिरस्थावर असल्याचे पाहायला मिळते आहे. 

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर -

अहमदाबाद - 94.42 रूपये प्रति लीटर 
बंगलोर - 101.9 रूपये प्रति लिटर 
चंदीगढ - 96.2 रूपये प्रति लिटर 

कोलकता येथे पेट्रोल 106.0 रूपये प्रति लिटर, दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रूपये प्रति लिटर तर चेन्नई येथे 102.6 रूपये प्रति लिटर अशी किमती आज आहेत. डिझेलच्या किमतीही काहीश्या अशाच पाहायला मिळत आहेत. 

मागील महिन्यात उच्चांक 

फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या भारतात सर्वात जास्त होत्या. गेल्या काही वर्षांतून या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. मागच्या काही दिवसांमध्ये कच्चा तेलाच्या (Crude Oil) किमतीही वाढल्या होत्या. त्यामुळे याचा फटाकाही अनेक क्षेत्रांना बसला होता. सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांसाठी ही चिंतेत टाकणारी बाब आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लक्षणीय वाढ या वर्षीपासून दिसायला लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसा असा फरक पाहायला मिळतो आहे. फेब्रुवारी महिन्यात 24 वर्षांतला सगळ्यात जास्त उच्चांक या वेळी गाठला होता. या महिन्यात विक्रमी विक्री करण्यात आली आणि मागणीही प्रचंड वाढली होती. त्याचाच फटका या महिन्यात पाहायला मिळेल. 

(माहिती - विविध स्त्रोत)