Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

Petrol-Diesel Price Today: डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे.  

Updated: Sep 28, 2021, 12:41 PM IST
Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ title=
संग्रहित छाया

मुंबई : Petrol-Diesel Price Today: डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे. (Fuel Price in India) मागील चार दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून 22 दिवसांमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. (petrol-diesel price today - hike in diesel and petrol  prices) सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे प्रतिलीटर मागे 20 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 21 पैशांनी वाढलेत. मागील पाच दिवसांमध्ये डिझेलचे दर 95 पैशांनी वाढलेत.

पेट्रोल-डिझेलच्या  (Petrol-Diesel Price) दराने पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 रोजी देशात आज पुन्हा डिझेलचे दर वाढले आहेत. (Diesel Price Hiked), तर आज पेट्रोलच्या किंमतीही वाढल्या आहेत. (Petrol Price Hiked) गेल्या पाच दिवसांतील चौथी वाढ पाहायला मिळत आहे. डिझेलमध्ये आज 25 ते 27 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरातील शहरांमध्ये पेट्रोल 20 ते 22 पैशांनी महाग झाले आहे. जवळपास दोन महिन्यांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. यापूर्वी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 24, 26 आणि 27 सप्टेंबरलाही डिझेलचे दर वाढवले ​​होते.

आजचे प्रमुख शहरातील दर पाहा

दिल्ली: पेट्रोल - ₹ 101.39 प्रति लिटर; डिझेल - ₹  89.57 प्रति लिटर

मुंबई: पेट्रोल - ₹ 107.47 प्रति लिटर; डिझेल - ₹  97.21 प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल - ₹ 101.87 प्रति लिटर; डिझेल - ₹  92.62 प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल - ₹ 99.15 रुपये प्रति लीटर; डिझेल - ₹ 94.17 प्रति लिटर

बंगळुरू: पेट्रोल - ₹ 104.92 प्रति लिटर; डिझेल - ₹  95.06 प्रति लिटर

भोपाळ: पेट्रोल - ₹ 109.85 प्रति लिटर; डिझेल - ₹  98.45 प्रति लिटर

लखनऊ: पेट्रोल - ₹98.51 रुपये प्रति लीटर, डिझेल - ₹ 89.98 रुपये प्रति लीटर

पाटणा: पेट्रोल - ₹ 104.04 प्रति लिटर; डिझेल -₹  95.70 प्रति लिटर

चंदीगड: पेट्रोल - ₹ 97.61 प्रति लिटर; डिझेल - ₹ 89.31 रुपये प्रति लीटर