Petrol Diesel Price Today 1st March 2023 : भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी (1 मार्च 2023) पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले असून किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol Diesel Rate) स्थिर राहिले असले तरी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
दिल्लीत पेट्रोलचा (Delhi Petrol Price) दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (Mumbai Petrol Price) पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्ली | 96.72 | 89.62 |
कोलकाता | 106.03 | 92.76 |
मुंबई | 106.31 | 94.27 |
चेन्नई | 102.63 | 94.24 |
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
वाचा: मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल तुमच्यासाठी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.