Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात केले मोठे बदल

आजचा इंधनाचा दर 

Updated: Aug 18, 2021, 10:52 AM IST
Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात केले मोठे बदल title=

मुंबई : पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price) या इंधन दरवाढीचा सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. या इंधनाच्या किंमतीत दरवाढ झाली आहे. इंडियन ऑइनच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आज इंधनांच्या दरात बदल झाला आहे. 

गेल्या एका महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज डिझेलच्या दरात कपात झाली असून पेट्रोलचे दर स्थिर झालेत. देशातील प्रमुख शहरात 20 पैसे डिझेलच्या दरात कपात झाली आहे. तेल कंपन्यांनी 17 जुलै रोजी पेट्रोलचे दर 30 पैशांनी कमी झालं आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. टॅक्समध्ये भरघोस वाढ झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दर रेकॉर्ड स्तरावर आहे. 19 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शहरात पेट्रोल 100 रुपये लीटरच्यावर पोहोचले आहे. 

या राज्यात 100 च्या पेट्रोल 

राज्य आणि केंद्र शासित प्रदेश राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, लडाख, कर्नाटक, जम्‍मू काश्‍मीर, ओडिसा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यात पेट्रोलचा दर 100 च्या पार आहे. 

जुलैमध्ये शेवटचे बदलले होते दर

18 जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. शेवटी पेट्रोलचे दर 17 जुलै रोजी वधारले होते. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते.

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.