Petrol Diesel Price : महागाईची टांगती तलवार! पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today : सध्या सर्वसामान्यांच्या डोक्यावर महागाईची टांगती तलवार आहे. सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेनं तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केलीय. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरांवर होऊ शकतो.

Shweta Chavan-Zagade | Updated: Apr 3, 2023, 09:24 AM IST
Petrol Diesel Price : महागाईची टांगती तलवार! पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर  title=
Petrol and Diesel Rate Today 3 April 2023

Petrol Diesel Price On 3 April 2023 : महागाईने (inflation) आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता आणखी एक भर पडली आहे. आधीच गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder price hike) वाढत्या किंमती, सोन्याच्या किंमतीत वाढ (Increase gold price), अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे वाढत्या दरामुळे (Rising prices of vegetables) सर्वसामान्य चिंतेत असतात आता पेट्रोल-डिझेल महाग (Petrol-diesel expensive) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक (Saudi Arabia and oil producers) आणि निर्यातदार देशांच्या संघटनेनं तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केलीय. त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) भडकण्यावर होऊ शकतो. 

जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीत (price of crude) पुन्हा मोठी उसळी पाहायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $85 पर्यंत वाढली आहे. तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला. आज यूपीसह अनेक राज्यांच्या शहरांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे.

वाचा : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?

यामध्ये गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 36 पैशांनी महागून 97 रुपये, तर डिझेल 30 पैशांनी वाढून 89.62 रुपये प्रति लिटर झाले. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी महागले असून 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 30 पैशांनी वाढले आहे आणि 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 84.57 पर्यंत वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $80.13 पर्यंत वाढला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये महागले

गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे.
नोएडामध्ये पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर झाले आहे.
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

आणखीन पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यापासून तेलाच्या उत्पादनात रोज 1.16 मिलियन बॅरल्सनी कपात करण्याची घोषणा केलीय. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरांवर (Petrol Diesel Price)  होण्याची शक्यता आहे. तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या देशांना याचा मोठा फटका बसेल. देशात तेल पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने देशातल्या रिफायनरींना तेल निर्यात न करण्याच्या सूचना केल्या आहेत. अधिसूचनेनुसार देशातल्या रिफायनरी त्यांच्या निर्यात कोट्यातील 50 टक्के पेट्रोल आणि 30 टक्के डिझेल देशात उपलब्ध करून देतील. याचा फटका खासगी रिफायनरींना बसणार आहे. खासगी रिफायनरी रशियाकडून कच्चं तेल स्वस्तात खरेदी करून ते देशात शुद्ध करून इतर देशात महागड्या दराने विकतात. मात्र सध्या ओपेक देशांनी तेल उत्पादक कमी केलं तर त्याचा थेट परिणाम कच्चा तेलाच्या किंमतींवर होऊन तेलाचे दर भडकतील.