Petrol Diesel Price on 26 July 2023: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. मात्र त्याचा भारतातील तेलाच्या किमतीवर (Petrol Diesel Price) फारसा परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा दर 0.28 डॉलरवरुन घसरून 79.35 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडचा दर 0.31 डॉलरवरुन घसरून 83.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशभरातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात. बुधवार, 26 जुलै 2023 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये किमती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर काही शहरांमध्ये इंधनाच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या दरात काही घसरण नोंदवली जात आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 26 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होत की, लवकरच देशात पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली आणले जातील. मात्र, हे कधी होणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपयांना विकलं जात आहे.
कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले
आग्रा- पेट्रोल 32 पैसे स्वस्त होऊन 96.10 रुपये, डिझेल 32 पैसे स्वस्त होऊन 89.27 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
अहमदाबाद- पेट्रोल 56 पैसे स्वस्त होऊन 96.42 रुपये, डिझेल 56 पैसे स्वस्त होऊन 92.17 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
अजमेर - पेट्रोल 55 पैशांनी महागून 108.62 रुपये, डिझेल 50 पैशांनी महागून 93.85 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
नोएडा - पेट्रोल 47 पैशांनी 97.00 रुपये, डिझेल 43 पैशांनी 90.14 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.
गोरखपूर – पेट्रोल 14 पैशांनी महागले आहे 96.91 रुपये, डिझेल 14 पैशांनी महागले आहे 90.09 रुपये.
जयपूर- पेट्रोल 37 पैशांनी 108.45 रुपये, डिझेल 33 पैशांनी महागून 93.69 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 6 पैसे स्वस्त 97.04 रुपये, डिझेल 5 पैसे स्वस्त दराने 89.91 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.