Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात आज बदल, पाहा तुमच्या शहरातील किंमती

Petrol Price : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशात आज पण पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 13, 2023, 08:10 AM IST
Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात आज बदल, पाहा तुमच्या शहरातील किंमती title=
Petrol-Diesel Price on 13 April 2023

Petrol-Diesel Price on 13 April 2023 : कच्चा तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूड $2 पेक्षा जास्त महागला आहे. परिणामी क्रू़डच्या वाढत्या किमतीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate) दरावर दिसून येतो. आज जाहिर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीमध्ये पाटणा, गुरुग्रामसह देशातील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर पेट्रोल-डिझेल भरायचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा...

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत $2 पेक्षा जास्त वाढून प्रति बॅरल $87.21 पर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दर देखील प्रति बॅरल $83.16 पर्यंत वाढला आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर (Petrol Diesel Price) दिसून येतो. यामध्ये बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 107.74 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल94.82 रुपये प्रति लिटर झाले. त्याचप्रमाणे आज हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.38 रुपये तर डिझेल 90.24 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

वाचा: राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

  • दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 98.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x