आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अद्यतनित केले जातात. देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर झाल्यानंतरही प्रत्येक शहरात दर वेगवेगळे असतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत वाढ झाली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 11, 2023, 07:25 AM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर title=

Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत किंचित वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 0.44 ने वाढून प्रति बॅरल 73.43  डॉलरवर विकले जात आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.38 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 78.07 डॉलरने  विकलं जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या किमती जाहीर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या वाढीदरम्यान आज 420व्या दिवशी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात दिलासा मिळाला आहे. 

 मंगळवारी पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंतसा दिलासा मिळाला आहे. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

इंडियन ऑइलच्या नवीन दरानुसार, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 आहे, तर डिझेल 98.24 रुपयांना विकले जात आहे. दुसरीकडे, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर गेले आहे. बिहार, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

दिल्लीत पेट्रोल 96.72 प्रति लिटर आणि डिझेल 89.62 वर स्थिर आहे.

चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.

अमृतसरमध्ये पेट्रोल 98.74 रुपये आणि डिझेल 89.04 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये आहे.

इंदूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.66 रुपये आणि डिझेलची किंमत 93.94 रुपये आहे.

जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.48 रुपये आणि डिझेलची किंमत 93.72 रुपये आहे.

पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे.