पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, पाहा आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या उलटफेरींमुळे गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.

Updated: Sep 12, 2019, 11:35 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, पाहा आजचा भाव title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या उलटफेरींमुळे गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. याआधी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले होते, यानंतर बुधवारी तेच दर कायम राहिले. यानंतर आता गुरुवारी पेट्रोलचा भाव ६ पैसे प्रती लीटर आणि डिझेलचा भाव ५ पैसे प्रती लीटरने वाढला आहे.

गुरुवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ७७.५० रुपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ६८.३७ रुपये एवढे आहेत. तर दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सगळ्यात कमी आहेत. दिल्लीत पेट्रोल ७१.८२ रुपये आणि डिझेल ६५.१९ रुपये प्रती लीटर आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत ५६.२० डॉलर प्रती बॅरल आणि ब्रेंट क्रूडची किंमत ६१.२५ डॉलर प्रती बॅरल आहे.