मुंबई : जागतिक स्तरावर क्रूड ऑइल (Crude Oil) चे दर 2014 नंतर पहिल्यांदाच 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. रशिया आणि युक्रेनची लढाई (Russia-Ukraine war) सुरु झाल्यापासून क्रूड ऑईलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा सरळ परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत (Petrol-Diesel Price)वर होत असतो. क्रूड ऑयल गेल्या वर्षी दिवाळीमध्ये बऱ्याच वेळ कमी जास्त झालं आहे. पण त्याचा दरांवर जास्त मोठा परिणाम झाला नव्हता. गेल्या वर्षी दिवाळीला केंद्र सरकारने पेट्रोलवर सीमा शुल्क (अबकारी शुल्क) 5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लीटर कपात केले होते. (Petrol-Diesel price Hike In march)
तीन वर्षात पहिल्यांदाच सरकारने टॅक्समध्ये (Tax on Petrol Diesel) कपात करुन दिलासा दिला होता. गेल्या 100 दिवसांपासून दर स्थिर आहेत. पण आता दर वाढण्याच्या शक्यता आहेत. पुढच्या महिन्य़ात दर वाढतील असा अंदाज आहे. 10 मार्च रोजी ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत. त्यानंतर दर वाढतील अशी शक्यता आहे.
कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर भारतात देखील दर वाढले होते. भाजपशासित राज्यांमध्ये देखील टॅक्समध्ये कपात करुन दिलासा देण्यात आला होता. चार नोव्हेंबर रोजी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी केला होता. त्यानंतर पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटर झाले होते.
सरकारने दरात कपात केली तेव्हा कच्चा तेलाचे दर 69.52 डॉलर प्रति बॅरल होते. पण आज हेच दर 93.61 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे. Ballpark च्या नुसार, कच्चा तेलाचे भाव वाढल्यानंतर प्रत्येक एक डॉलर मागे 70 ते 80 पैसे वाढ करते. याचा अर्थं पेट्रोल आणि डिझेलमध्ये सात ते आठ रुपये प्रति लीटर वाढ होते. पण इतकी मोठी वाढ एकदाच केली जात नाही. हळूहळू दर वाढवल जातात.
पुढच्या महिन्यात जर दर वाढले तर याचं कारण ऑईल मार्केटिंग कंपन्या हळूहळू त्यांच्या वाढलेल्या किंमती रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतील.