नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री मारली आहे. इंधनाचे वाढते दर देशातील नागरिकांच्या राहणीमानाचं गणित बिघडवून गेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीत जास्त कर आकारणाऱ्या राज्यांची नावं सांगितली आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार देशात पेट्रोलवर सर्वाधिक कर मध्यप्रदेश या राज्यात लावण्यात येतो. तर, राजस्थांनमध्ये डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक कर आकारला जातो.
Corona Vaccination : महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेचं मोठं यश, 'अशी' कामगिरी करणारं देशातील पहिलं राज्य
2020-21 दरम्यान आकारला गेला किती कर ?
(Petrol and diesel Price) चालू महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. याच गमिताची फोड करुन पाहिल्यास समोर आलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 55 आणि 50 टक्के राज्यांचे कर जोडलेले असतात.
पुरी यांनी लोकसभेच्या एका सत्रामध्ये दिलेल्या लिखित स्वरुपातील उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, केंद्राकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोलच्या दरांवर 1,01,598 कोटी रुपये आणि डिझेलच्या दरांवर 2,33,296 इतकी कराची रक्कम आकारली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थांनमध्ये आकारल्या जाणाऱ्या कराचा आकडा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासन पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमत आणि केंद्रीय कराच्या पूर्ण आकड्यावर वॅट आकारते. देशात सर्वाधिक कमी वॅट अंदमान- निकोबार द्वीपसमुहात आकारला जातो. याचं प्रमाण अनुक्रमे 4.82 रुपये प्रति लीटर आणि 4.74 रुपये प्रति लीटर इतकं आहे.
मध्य प्रदेशात पेट्रोलवर 31.55 रुपये प्रति लीटर इतका वॅट आकारला जातो. तर, राजस्थानमध्ये डिझेलवर 21.82 रुपये प्रति लीटर इतका वॅट आकारला जातो.