Petrol Diesel Price Today : नवे दर जारी, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? झटपट चेक करा आजचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतींच्या नरमाईचा परिणाम आज अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. जाणून घ्या आजचे दर... 

Updated: Mar 23, 2023, 08:12 AM IST
Petrol Diesel Price Today : नवे दर जारी, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? झटपट चेक करा आजचे दर title=
Fuel Prices today Check petrol and diesel rates

Petrol Diesel Price on 23 March 2023 : कच्चा तेलाच्या दरात आजही चढ-उतार सुरूच आहेत. दरम्यान सरकारी तेल विपणन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती सुधारित केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि जागतिक बँकांच्या आर्थिक संकटामुळे कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीनेही $76 ओलांडले आहे. त्याचा परिणाम आज (23 मार्च 2023) सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतींवर (पेट्रोल डिझेल प्राइस टुडे) दिसून येत आहे. आज  यूपीपासून बिहारपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत.

तर नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी स्वस्त झाले आणि ते 96.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तर डिझेल 26 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग होऊन 96.57 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 53 पैशांनी स्वस्त होऊन 107.59 रुपये प्रति लीटर विकले जात आहे, तर डिझेल 50 पैशांनी घसरून 94.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

वाचा :  IMD च्या 'या' इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान

दरम्यान गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत लक्षणीय बदल झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 76.03 पर्यंत वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआय दर देखील प्रति बॅरल $70.15 पर्यंत वाढला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 97.24 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दर बदलले

- नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पाटणामध्ये पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.